मराठी रंगभूमीच्या शिरपेचामध्ये रोवणारे पुरस्कार
शिलेदार कुटुंबाच्या संगीत साधनेला रसिक श्रोत्यांनी उदंड प्रतिसाद दिला. शिलेदार कुटुंबाच्या या अखंड व्रताला, अविरत संगीत साधनेला विविध प्रकारे गौरवान्वित करण्यात आले. संगीत रंगभूमीच्या या शिलेदारांना मिळालेल्या पुरस्कारांचा थोडक्यात आढावा
जयमाला शिलेदार
- २०१३ राष्ट्रीय पुरस्कार 'पद्मश्री'
- २०१२ राज्यशासन पुरस्कृत अण्णासाहेब किर्लोस्कर जीवन गौरव
- २०११ संगीत नाटक अकादमी पुरस्कृत रवींद्रनाथ टागोर सन्मान
- २०१० बी. वाय. पाध्ये पुरस्कार
- २००६ राज्यशासन पुरस्कृत लता मंगेशकर पुरस्कार
- २००१ राजर्षि शाहू पुरस्कार
- २००१ पुणे मराठी ग्रंथ संग्रहालयातर्फे कृष्णराव गोखले स्मृती पुरस्कार
- २००० अल्फा टीव्ही मराठीतर्फे जीवन गौरव पुरस्कार
- १९९९ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिचंवड शाखा प्रणित बालगंधर्व`पुरस्कार
- १९९८ नाट्यदर्पण तर्फे महिंद्र नटराज पुरस्कार
- १९९३ पुणे महापालिकेतर्फे बालगंधर्व पुरस्कार
- १९९३ महाराष्ट्र शासनातर्फे बालगंधर्व पुरस्कार
- १९८४ मराठी रंगभूमी व शिलेदार कुटुंबियांसाठी विष्णुदास भावे गौरव पदक
- १९७८ कोल्हापूर महापालिकेतर्फे मानपत्र
- १९७४ माधवराव शिंदे पुरस्कृत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुरस्कार
किर्ती शिलेदार
वयाच्या १० व्या वर्षांपासून रंगभूमी गाजविणाऱ्या आणि आजही तितक्याच जोमाने कार्यरत असलेल्या किर्ती शिलेदार यांचे संगीत नाटकातील योगदान फार मोठे आहे. वाणीमध्ये साक्षात सरस्वतीचा वास असणाऱ्या किर्ती शिलेदार यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले .
- २०१५ साली राज्यशासन पुरस्कृत अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्काराने गौरविले
- नटसम्राट बालगंधर्व यांच्या नावे जाहीर झालेले महाराष्ट्र शासन, पुणे, महानगरपालिका व पिपरी चिंचवड नाट्यपरिषद हे तीनही मानाचे पुरस्कार जयमाला शिलेदार यांच्या नंतर किर्ती शिलेदार यांनाच मिळाले.
- उपशास्त्रिया संगीतासाठी महाराष्ट्र शासनाचा कलागौरव पुरस्कार
- नाट्यदर्पणचा 'सेवाव्रती' पुरस्कार
- अभय छाजेड यांच्या कलागौरव प्रतिष्ठानचा जीवन गौरव पुरस्कार
- पुणे नाट्य परिषदेचा माणिक वर्मा सन्मान
- 'शास्त्रीय संगीतात सूर तालाइतकेच शब्दार्थाचे, काव्याचे महत्व' या विषयावर शोध निबंध लिहिण्यासाठी 'शशांक लालचंद' शिष्यवृत्ती. हा शोधनिबंध मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध झाला
लता शिलेदार
वयाच्या ६ व्या वर्षांपासून रंगभमीवर कार्यरत असणाऱ्या लता शिलेदार यांनी सुमारे ४००० प्रयोगातून रंगभूमीवर आपले एक विशेष स्थान निर्माण केले. कलासंस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा मेळ घालण्याचे अनोखे सामर्थ्य लता शिलेदार यांच्यामध्ये आहे. त्यांच्या लेखनशैलीसाठी त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
- 'नादलुब्ध मी' या नाटकाच्या लेखनासाठी विद्याधर गोखले पुरस्कार
- 'चांद्रमाधवी' या नाटकाच्या लेखनासाठी काकासाहेब खाडिलकर गौरव पुरस्कार
- 'स्वरविभ्रम' या नाटकाच्या लेखनासाठी थिएटर अकॅडमी वोडाफोन संगीत स्पर्धेत प्रथम पारितोषिक
- नाट्यपरिषदेतर्फे लता शिलेदार याना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
- बालगंधर्व पुरस्कार
- माणिक वर्मा पुरस्कार
- दिनानाथ मंगेशकर पुरस्कार
- चांदोरकर पुरस्कार
- मामा वरेरकर पुरस्कार
- रामकृष्णबुवा वझे पुरस्कार